
Kerala-Diaries (Part 5)
#Kerala_diaries (भाग - ५) Vagamon मध्ये प्रवेश केल्यापासून अगदी नाक्या नाक्यावर विकली जाणारी ही किंचित काटेरी लालसर रंगाची फळं आमचं लक्ष सतत वेधून घेत होती. हे नक्की काय आहे? कसं खातात? फळ की भाजी? असे अनेक प्रश्न पडले म्हणून गाडी थांबवून एका विक्रेत्याला विचारलं पण किंचित निराशाच झाली कारण तो काय बोलला हे आम्हाला कळलंच नाही 😆 दुसऱ्या दिवशी सफारी साठी जीप बुक केली होती. त्या जीपमधल्या जितीन नावाच्या आमच्या ड्रायव्हर मित्राला काम चलावू हिंदी इंग्रजी बोलता येत होतं. त्याने सां