(भाग - ५)
Vagamon मध्ये प्रवेश केल्यापासून अगदी नाक्या नाक्यावर विकली जाणारी ही किंचित काटेरी लालसर रंगाची फळं आमचं लक्ष सतत वेधून घेत होती. हे नक्की काय आहे? कसं खातात? फळ की भाजी? असे अनेक प्रश्न पडले म्हणून गाडी थांबवून एका विक्रेत्याला विचारलं पण किंचित निराशाच झाली कारण तो काय बोलला हे आम्हाला कळलंच नाही 😆
दुसऱ्या दिवशी सफारी साठी जीप बुक केली होती. त्या जीपमधल्या जितीन नावाच्या आमच्या ड्रायव्हर मित्राला काम चलावू हिंदी इंग्रजी बोलता येत होतं. त्याने सांगितलं हे फळ आहे आणि हे केरळ मध्ये बरंच प्रसिध्द आहे. ह्याचं नाव आहे रंबुटा (Rambutan).
खाऊन बघितल्यावर कळलं हे आतून अगदी लीची सारखं दिसतं पण लिची पेक्षा खूप जास्त रसाळ आणि आंबट गोड चवीचं. लिची सारखीच आत बी सुद्धा असते आणि अगदी मऊ, लुसलुशीत गर. ही फळं विकत घेऊन पोटोबात कधी स्वाहा झाली कळलं सुद्धा नाही. शिवाय एक अतिशय वेगळं आणि चविष्ट फळ चाखल्याचा विशेष आनंद झाला तो वेगळाच.
(Part - 5)
As we stepped foot in Vagamon, a reddish and thorny fruit grabbed our attention. It was being sold at every nook and corner of the street. We were curious to know what it was, how it was eaten, and whether it was a fruit or a vegetable. We stopped the car to ask a seller but returned with disappointment as we couldn't understand what the seller was trying to say.
We were supposed to go on a jungle safari the next day and so we had booked a jeep. Thankfully, our driver, Jitin could speak a bit of both Hindi and English. He told us that the fruit we had seen the other day was called Rambutan and was quite popular in Kerala.
While eating the fruit, we realised that it looked like Litchi from the inside but was juicier and combined the taste of sour-sweet. It also contained a seed just like Litchi and had soft, squishy insides. After having it once, we couldn't stop ourselves from devouring this fruit given its unique taste.
Comentários